महत्वाच्या बातम्या

 परिस्थितीचा बाऊ न करता प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश शक्य 


- नवोदय विद्यालयात विज्ञान ज्योती योजना शुभारंभ

- माजी विद्यार्थी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक सुरज कोडापे यांचाही यावेळी सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तहसील अंतर्गत घोट येथे केंद्र सरकारचे एकमेव जवाहर नवोदय विद्यालय आहे. या शाळेत होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जात आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे जवाहर नवोदय विद्यालयात विज्ञान ज्योती योजना सुरू करण्यात आली आहे. 

यावेळी नुकतेच एमपीएससी परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेले नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी सूरज कोडापे यांचाही ह्यावेळी शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जेईई आणि नीट सह आता मुला मुलींना इतरही क्षेत्रात अनेक मार्ग मोकळे झाले आहेत. स्पर्धा परीक्षेत देखील अलीकडच्या काळात मुली ह्या अग्रेसर ठरत आहेत.त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहून आपले स्वप्न साकार करावे असे प्रतिपादन प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती सूरज कोडापे यांनी केले.

विज्ञान ज्योती  योजनेंतर्गत ज्या विद्यार्थिनी गरीब आहेत, आर्थिक अडचणीमुळे मुलींना डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक ठिकाणी संघर्ष करावे लागत आहे अशा विद्यार्थिनींसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. ही योजना इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या मुलींसाठी आहे. या योजनेचा शुभारंभ गुरुवारी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य राजन गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी या योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते नीट आणि जेईईची संदर्भ ग्रंथे वाटप करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य विजय इंदुरकर, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक कोहाडे प्रामुख्याने उपस्थित होते. सिमरन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos