महत्वाच्या बातम्या

 नव्याने लागू होणाऱ्या तीन मुलभुत फौजदारी कायद्याविषयी जनजागृती व चर्चासत्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : नव्याने पारीत करण्यात आलेले फौजदारी कायदे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय न्याय संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारुका यांच्या मार्गदर्शनात चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

18 एप्रिल रोजी चर्चासत्र व 19 एप्रिल रोजी आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश -4 जिवन पेडगावकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी भारतीय साक्ष अधिनियम 2023 कायद्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर कामगार न्यायाधीश श्रीपाद देशपांडे यांनी  नागरिक सुरक्षा संहिता 2023 व भारतीय न्याय संहिता 2023 या नव्याने लागू होणाऱ्या कायद्याबाबत स्लाईड शो च्या माध्यमातून माहिती दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन ॲड. प्राची भगत व आभार ॲड. कल्याणी गडपाल यांनी मानले. कार्यक्रमाला विधी स्वयंसेवक, लोकअभिरक्षक, पॅनल वरील अधिवक्ता व कर्मचारी उपस्थित होते. 





  Print






News - Wardha




Related Photos