महत्वाच्या बातम्या

 मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडी बाजार बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला असून आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे. मतदान १९ एप्रिल, २०२४ रोजी व मतमोजणी ०४ जून, २०२४ रोजी होणार असून या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी निर्गमीत केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेच्या, निर्भय व निपक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने निर्देशीत केल्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक आठवडी बाजाराच्या निमित्याने मतदान केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार असून त्याचा फायदा समाजकंटक व कायदा व सुव्यवस्था बाधीत करण्याचा हेतु ठेवणा-या लोकांकडून होण्याचा संभव नाकारता येत नाही. अंमलात असलेली निवडणूक आंचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याकरीता १९ एप्रिल २०२४ रोजी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व ठिकाणाचे आठवडी बाजार बंद ठेऊन दुस-या दिवशी किंवा सोयीच्या इतर दिवशी बाजार भरविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.    





  Print






News - Bhandara




Related Photos