महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार २ महिण्याकरीता हद्दपार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील सराईत गुन्हेगार भास्कर नानाजी कारमेंगे (५०) याचेवर यापुर्वी, खुन, दारुबंदी व जुगार कायद्यान्वये असे एकुण १५ गुन्हे नोंद आहेत. त्याचेवर यापुर्वी विविध कलमान्वये करण्यात आली होती. परंतु त्याचेवर त्याचा काहीही परीणाम झालेला नव्हता. तो प्रतीबंधक कार्यवाही करुन सुध्दा जुमानत नसल्याने त्याचेविरुध्द गंभीर दखल घेवून सराईत गुन्हेगार नामे भास्कर नानाजी कारमेंगे (५०) रा. लाडबोरी ता. सिन्देवाही याचे वृत्तीस आळा बसावा याकरीता उपविभागीय अधिकारी चिमुर यांनी सराईत गुन्हेगार हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने व सार्वत्रीक लोकसभा विवडणुक २०२४ ची आदर्श आचार संहिता लागू असल्याने त्यास २ महिण्याकरीता चंद्रपुर जिल्ह्यातुन हद्दपार करुन त्यास साखरा जि. गडचिरोली येथे त्याचे नातेवाईकडे नेवुन सोडण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपुर, रिना जनबंधु, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर, दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनात सपोनि तुषार अ. चव्हाण, स.फौ. विनोद बावणे यांनी अथक परीश्रम घेतले. 

सिंदेवाही तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्याकरीता अशा प्रकारचे वारंवार गुन्हे करणारे व पोलीस कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगाराची माहीती संकलीत करुन त्याचेविरुध्द तडीपारी अन्वये कारवाई करण्यात आली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos