नवरगाव येथे पोलिसांचा रुट मार्च
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवरगावातील मुख्य मार्गाने पोलीसांनी रूट मार्च काढला. सिंदेवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच तामीळनाडू राज्याच्या पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.
सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असून पहील्या टप्प्यातील निवडणुक १९ एप्रील आहे. समोर हनुमान जयंती, राम नवमी उत्सव आहे. सण व लोकसभा निवडणूक अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणताही अनुचित घटना घडू नये, शांतता कायम रहावी या उद्देशाने पोलीस विभागाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. त्यावेळी सिंदेवाही पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीसांचे पथक उपस्थित होते.
News - Chandrapur