मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या ५० - ५० फॉर्म्युल्याप्रमाणे होईल : उद्धव ठाकरे


वृत्तसंस्था / मुंबई :  विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा मिळविण्याचे   स्वप्न पाहणाऱ्या भाजपा-शिवसेना युतीला चांगलाच फटका बसला आहे. मतमोजणीत दोन्ही पक्षांच्या जागा कमी झाल्यामुळे, राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या ५० - ५० फॉर्म्युल्याप्रमाणे होईल असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत सर्व मतदारांचे आभार मानले. “लोकसभेआधी शिवसेना आणि भाजपा यांच्यात ५० - ५० चा फॉर्म्युला ठरला होता. मात्र विधानसभेच्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मला विनंती केल्यामुळे मी त्यांची अडचण समजून घेतली. मात्र प्रत्येकवेळी मी सगळ्या अडचणी समजून घेणार नाही, मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. याचसोबत सत्तास्थापनेची आपल्याला कोणतीही घाई नसून सर्व पर्याय खुले असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. 
  Print


News - Rajy | Posted : 2019-10-24


Related Photos