महत्वाच्या बातम्या

 युवक, दिव्यांग व महिला मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान केंद्राची निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघातील वर्धा विधानसभा मतदार संघातील ३२९ मतदान केंद्र व २ सहाय्यकारी मतदान केद्र अशा ३३१ मतदान केंद्रापैकी काही मतदान केंद्रांवर युवक, दिव्यांग, महिला मतदारांची टक्केवारी वाढविण्याकरीता प्रत्येकी दोन मतदान केद्राची व मुस्लीम महिला मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी १९ मतदान केंद्राची निवड करण्यात आली आहे. नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत  या मतदान केंद्रावर आवश्यक विविध सेवा पुरविण्यात येणार असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजगृती करण्यात येत आहे.

वर्धा विधानसभा मतदार संघातील लोकसभा  निवडणूकीमध्ये नाविन्यपूर्ण  उपक्रम राबविण्यात येत आहे. ३३१ मतदान केंद्रापैकी  युवा मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी  यादी भाग क्रमांक १९३ केसरीमल कन्या शाळा, खोली क्रमांक ४ व  यादी भाग क्रमांक २१८ जगजिवनराम माध्यमिक विद्यालय, रामनगर, दिव्यांग मतदार मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याकरीता व मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता यादी भाग क्रमांक २२७ अंजुमन स्कुल वर्धा खोली क्रमांक २ व यादी भाग क्रमांक  २३४ सत्यनारायन बजाज जिल्हा ग्रंथालय वर्धा, महिला मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी यादी भाग क्रमांक २५३ शासकीय विद्यालय केंद्र व यादी भाग क्रमांक ३०९ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमनगर सावंगी मेघे खोली क्रमांक ४ तसेच मुस्लीम बहुल भागात मुस्लीम महिला मतदारांचे मतदान वाढविण्याकरीता  परदानशीन महिला १९ मतदान केंद्राची निवड करण्यात आलेली आहे.

जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेण्याकरीता वर्धा विधानसभा मतदार संघात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावावा असे, आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक कारंडे यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos