१ नोव्हेंबर पासुन बँकेच्या वेळेत बदल ; पैशांचे व्यवहार दुपारी ३ वाजेपर्यंतच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : 
महाराष्ट्रात बँकांची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व बँका एकाच वेळी उघडल्या जाणार आहेत. या नवीन निर्णयात बँका सकाळी १० वाजता उघडणार असून संध्याकाळी ५ वाजता बंद केल्या जाणार आहेत. मात्र पैशांचे व्यवहार हे दुपारी ३ वाजेपर्यंतच केले जाणार आहेत. हे नवीन नियम १ नोव्हेंबरपासून लागू केले जाणार असून अर्थ मंत्रालयाने वेळ बदलाचे आदेश दिले होते.
याआधी प्रत्येक बँकेची वेळ हि वेगळी होती. त्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बँकेतील कामकाज चालत असे. तर काही बँकांची वेळ हि ९ ते ३ अशी असे. कमर्शियल अ‍ॅक्टिव्हिटीची वेळ देखील बदलण्यात आली आहे. यापुढे याची वेळ हि सकाळी ११ वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच काही बँकांची कामाची वेळ हि १० ते ५ इतकी करण्यात आली आहे.
सरकारने सर्व बँकांशी विचार करून हि वेळ ठरवण्यात आली असून ग्राहकांच्या सुविधेसाठी बँकेने हि वेळ ठरवली आहे. त्यामुळे बँकेच्या तीन वेळा ठरवण्यात आल्या असून पहिली वेळ हि ९ ते  ३ करण्यात आली आहे. दुसरी वेळ हि  १० ते  ४ तर तिसरी वेळ हि  ११ ते  ५ अशी ठरवण्यात आली आहे. हे नियम शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील लागू होणार आहेत.  Print


News - World | Posted : 2019-10-19


Related Photos