महत्वाच्या बातम्या

 नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघासाठी ९७ उमेदवार निवडणूक रिंगणात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यासाठी नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघात ९७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

नागपूर लोकसभा मतदारसंघातून २६ पैकी एकाही उमेदवाराने आज अर्ज मागे घेतला नाही. रामटेक लोकसभा मतदारसंघात ३५ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात २२ उमेदवारांपैकी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १८ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवारांपैकी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मिलींद नरोटे व हरिदास बारेकर या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता १० उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत होणार आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५ उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्यासाठी नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार असून ४ जूनला मतमोजणी होणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos