महत्वाच्या बातम्या

 खर्च निरीक्षक श्रीधर दास यांनी घेतला मतदार संघाचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक व सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून खर्च निरीक्षक श्रीधर दास यांनी आर्वी, धामणगाव व मोर्शी या तिनही विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांचा निवडणूक विषयक कामकाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयालयातील सभा कक्षातून दुरदृश्य प्रणालीव्दारे आढावा घेतला.

मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी सुरज बारापत्रे प्रत्यक्ष तर तिनही विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दुरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बँकांमधून मोठ्या प्रमाणात रोख काढल्या गेली असल्यास त्याचीही चौकशी करण्यात यावी. उमेदवारांच्या सभा व प्रचार कार्य आदीची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डींग करण्यात यावी. या व्हिडिओ रेकॉर्डींगची तपासणी करण्यात यावी. उमेदवारांनी सादर केलेला खर्च व रेकॉर्डींगमधील बाबी तपासूनच नियमित नोंद घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

स्थायी निगराणी पथकामार्फत सुध्दा नियमित व्हिडिओ रेकॉर्डींग होणे आवश्यक आहे. रोख व मद्य पकडणे या घटनेची व्हिडिओ रेकॉर्डींग आवश्यक असून प्रत्येक घटनाक्रमाचा पुरावा गोळा करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच येणाऱ्या अडीअडचणींबाबत मार्गदर्शन केले.





  Print






News - Wardha




Related Photos