महत्वाच्या बातम्या

 आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत साडेतीन लाख रुपयांच्या मुद्देमालासह दारू जप्त


- राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
- १५ आरोपी विरुध्द गुन्हे दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा निवडणूकी दरम्यान दारुची वाहतुक करणा-या व विक्री करणा-या कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने दोन विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून ३ लाख ५३ हजार २७५ रुपयाचा मुद्देमालासह हातभट्टी दारु, हातभट्टी रसायन व देशी दारु जप्त करुन आरोपीविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अंदोरी शिवार, देवळी शिवार, आंजी शिवार, आष्टी, तळेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्र दारुबंदी गुन्हेसबंधी छापे टाकून एकुन १५ आरोपी विरुध्द गुन्हे दाखल करुन ३४० लिटर गावठी हातभट्टी, ८ हजार ८० लिटर हातभट्टी रसायन व २४.७५  लिटर देशी दारु जप्त करण्यात आली. यामध्ये ३ लाख ५३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos