मोबाईल चोरटे जेरबंद, २३ महागडे मोबाईल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
शहरातून ३  अट्टल मोबाईल चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून चोरट्यांकडून २३ महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
दीपक कालिदास चांदेकर (१९), नईम शेख कलाम (२३) दोन्ही रा. अंचलेश्वर गेट चंद्रपूर आणि भारत रानु मडावी (२९) रा. जलनगर वार्ड चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ७ ऑक्टोबर रोजी आरोपींनी ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरल्याची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. चोरट्यांची माहिती मिळताच आरोपींना ताब्यात घेवून विचारपूस केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून २३ मोबाईल जप्त करण्यात आले.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोलिस निरीक्षक ओ.जी. कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार धनराज करकाडे, पोलिस शिपाई रविंद्र, गोपाल, अमोल, संजय वाढई यांनी केली आहे.

 
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-10


Related Photos