महत्वाच्या बातम्या

 पिकांच्या ट्रेसिबिलीटी नोंदणीमध्ये देशात महाराष्ट्र प्रथम : पाऊण लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन फलोत्पादन संचालक कैलास मोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये फळे व भाजीपाला पिकांचे क्षेत्र वाढावे आणि तुलनेने निर्यात वाढावी, तर त्यासाठी शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना कांदा नेट आणि द्राक्ष नेट प्रणालीमध्ये जी अडचण येत होती त्या अडचणी आता मिटल्या असून शेतकऱ्यांना यादी उपलब्ध होत नव्हती ती यादी आता सहजपणे उपलब्ध झालेली आहे असं या बैठकीमध्ये फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी सांगितले. या बैठकीसाठी अपेडा चे रिजनल मॅनेजर प्रशांत वाघमारे, विभागीय पीक संरक्षण विभागाच्या श्री मीना, आत्मा विभागाच्या सामेतीच्या श्रीमती भोपळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील गणेशखिंड संशोधन केंद्राचे डॉ. निरमाळी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सर्वांत जास्त ट्रेसिबलिटी नोंदणी -

चालू वर्षातील शेतकऱ्यांची नोंदणी (ट्रेसिबिलीटी) - ७३ हजार ३३७

कांदा - ७ हजार ९२०, द्राक्षे - ४४ हजार २३३, आंबा - ५ हजार ९४३, डाळिंब - ९ हजार ३१३, सायट्रस - १ हजार ४०६, व्हेजनेट - ३ हजार ७०२, विड्याची पाने - १०४, इतर - ७१६. 

भाजीपाला व फळांच्या निर्यातीसंदर्भातील अपेडा आणि निर्यातदारांकडून प्राप्त झालेल्या समुहाची यादी जिल्हा व तालुकानिहाय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच फायटो अधिकाऱ्यांना भाजीपाल्याच्या प्रशिक्षणासंदर्भातील मार्गदर्शन करण्यात आले आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या इतर विभागाकडूनही निर्यातक्षण पिकांवर प्रशिक्षण देण्यासंदर्भाती चर्चा करण्यात आली आहे.

भाजीपाला निर्यातीसाठी लागणारे ग्रोवर प्रमाणपत्र आहे फलोत्पादन संचालक यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर देशातील फळे व भाजीपाला निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. त्याचबरोबर हॉर्टनेट प्रणालीद्वारे अधिकाधिक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन फलोत्पादन विभागाकडून करण्यात आले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos