महत्वाच्या बातम्या

 चाचा नेहरू बाल महोत्सवास प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, भंडारा व नागपूर या सहा जिल्ह्याच्या बालगृहातील बालकांसाठी चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज त्याचा प्रारंभ झाला. हा महोत्सव तीन दिवस राहणार आहे.

बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व एकमेकांबद्दल बंधूभाव निर्माण व्हावा या उद्देशाने विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास नागपूर कार्यालयाच्या वतीने विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे ग्रामीण पोलीस मुख्यालय, पाटणकर चौक येथे उद्घाटन करण्यात आले. हा महोत्सव १४ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवामध्ये मुलांच्या मेजवानीसाठी ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, महिला बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॅा. शिल्पा खरपकर, नूतन रेवतकर, रुपम देवांगन, छाया राऊत, भारती मानकर, दामोदर कुंबरे, नितीन माहुरले, प्रशांत विधाते आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिवीक्षा अधिकारी प्रशांत व्यवहारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Nagpur




Related Photos