महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिका-यांनी घेतला बीसीजी लसीकरण मोहिमेच्या नियोजनाचा आढावा


- टिबी मुक्त ग्रामपंचायत जिल्हा समन्वय समितीची सभा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात मे ते जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत वयस्क बीसीजी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान १८ वर्षावरील महिला व पुरुषांनी जवळच्या आरोग्य लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्यावे. लसीकरणासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी टिबी मुक्त ग्रामपंचायत जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत वयस्क बीसीजी लसीकरण मोहिमेच्या नियोजनाच्या आढावा बैठकीत केले.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज.पराडकर,  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटील आदी उपस्थित होते.

लसीकरण मोहिमे दरम्यान सर्व आरोग्य केंद्राच्या लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार असून आशा वर्करकडून लाभार्थ्यांना निकषानुसार सर्वे करण्यात येणार आहे. या लसीमुळे रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढेल वयस्क बीसीजी लस ही सुरक्षित व प्रभावशाली असून लसीकरणामुळे व्यक्तीची टिबीची प्रतिकार शक्ती १० ते १५ वर्ष राहिल.

शासनाने सुरु केलेल्या टिबी मुक्त ग्रामपंचायत या उपक्रमास पहिल्या वर्षात चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यामध्ये ४० ग्रामपंचायतीचा प्रस्ताव प्राप्त  झाला असुन  त्याची पडताळणी करण्यात आली आहे. टिबी मुक्त हा कार्यक्रम  २०२३ पासुन राबविण्यात येत आहे. टिबी मुक्त ग्रामपंचायतींना  प्रशस्तीपत्र व महात्मा गांधी यांचे सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. असे डॉ. हेमंत पाटील यांनी बैठकीत  सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos