महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१ मार्च महत्वाच्या घटना

१५६५ : रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.

१८०३ : ओहायो हे अमेरिकेचे १७वे राज्य बनले.

१८७२ : यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.

१८७३ : ई. रेमिंगटोन आणि सन्स कंपनी ने पहिल्या व्यावहारिक टंकलेखन यंत्र (टाईपरायटर) चे उत्पादन सुरू होते.

१८९३ : अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रात्यक्षिक दाखवले.

१८९६ : हेन्री बॅक्वरल अणुकिरणोत्सर्जीचे किडणे शोधले.

१९०१ : ऑस्ट्रेलियन लष्कर स्थापन करण्यात आले.

१९०७ : टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.

१९२७ : रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.

१९३६ : अमेरिकेतील महाकाय हूव्हर धरण बांधून पूर्ण झाले.

१९४६ : बँक ऑफ इंग्लंड चे राष्ट्रीयीकरण झाले.

१९४७ : आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.

१९४८ : गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

१९५४ : प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता.

१९६१ : अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पीस कॉर्पस स्थापन करते.

१९६१ : युगांडा मध्ये लोकशाही गणतंत्र सुरु होऊन पहिल्या निवडणुकी झाल्या.

१९९२ : बोस्‍निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.

१९९८ : एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.

१९९८ : दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

२००२ : पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.





  Print






News - todayspecialdays




Related Photos