महत्वाच्या बातम्या

 भरारी पथकाची बारावीच्या पाच कॉपीबहादरांवर कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : सन २०२४ परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने सर्व केंद्रावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. आज बारावीच्या रसायन शास्त्राच्या पेपरदरम्यान भरारी पथकाने कॉपीबहादरांवर कारवाई केली. त्यामध्ये सानगडी, साकोली, दिघोरी, लाखांदूर, तुपकर मुरमाडी, लाखनी केंद्रावर भरारी पथकाने भेटी देत कडक कारवाई केल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने कळवले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १२ वीच्या परीक्षेला कुठेही गैरप्रकार झाल्यास केंद्रप्रमुखांपासून जबाबदारी देण्यात आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी  दिले होते. तसेच भरारी पथकांनी पेपर कालावधीत केंद्र प्रमुख व सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, परीक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, संस्था प्रतिनिधी यांना ही परिक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशीत केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos