महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२७ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१८४४ : डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९०० : ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.

१९५१ : अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

१९९९ : पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.

२००१ : जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

२००२ : मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

१९८७ : मराठी राजभाषा दिन

२७ फेब्रुवारी जन्म

१८०७ : अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८८२)

१८९४ : जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १८२२)

१८९९ : इन्सुलिन चे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७८)

१९१२ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: १० मार्च १९९९)

१९२६ : मराठी व हिन्दी लेखिका ज्योत्स्‍ना देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१३)

१९३२ : ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०११)

१९८६ : भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग यांचा जन्म.

२७ फेब्रुवारी मृत्यू

१८९२ : फॅशन कंपनी लुई वूत्तोन चे डिझायनर लुई वूत्तोन यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८२१)

१८९४ : जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचे निधन. (जन्म: १३ जून १८२२)

१९८७ : अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान यांचे निधन.

१९३१ : थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले. (जन्म: २३ जुलै १९०६)

१९३६ : नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८४९)

१९५६ : भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८८८)

१९९७ : गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीवर यांचे निधन.

२०१० : भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)





  Print






News - todayspecialdays




Related Photos