महत्वाच्या बातम्या

 आजपासून तीन दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हयातील शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकाविषयी बंधुभाव, सांघिक भावना निमार्ण होण्यासाठी जिल्हा स्तरावर चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाचे उद्घाटन ग्रामीण पोलीस मुख्यालय क्रीडांगण पाटणकर चौक येथे उद्या, २१ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.

२३ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू असणार आहे. या महोत्सवात जिल्हयातील विविध शासकीय, स्वयंसेवी बालगृहातील तसेच चॉईल्ड लाईन लाभार्थी इत्यादी बालकांचा सहभाग असणार आहे. त्यात विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन केलेले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे.

तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.             





  Print






News - Nagpur




Related Photos