महत्वाच्या बातम्या

 सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणारे दाम्पत्य व संस्थेस अनुदानाची मान्यता


- सामाजिक न्याय विभागाची कन्यादान योजना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : विवाह सोहळ्यामध्ये अनाठायी खर्च करणे, त्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे हे प्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (नवबौध्दांसह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणा-या जोडप्यांना शासन निर्णय २ फेब्रुवारी २०१९ अन्वये कन्यादान योजना सुरू करण्यात आली आहे.

सदर योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये  भाग घेणा-या मागासवर्गीय दाम्पत्यासाठी वस्तुरुपाने २०हजार रुपये तसेच स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे ४ हजार रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.





  Print






News -




Related Photos