महत्वाच्या बातम्या

 ए.डब्ल्यू.एस. स्विमिंग पूल स्पर्धेत वरोराचे सदस्यांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा साकोली शिव निबांध तलाव येथे ६ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

या स्पर्धेत वरोरा येथील ए.डब्ल्यू.एस. स्विमिंग पूल सदस्यांनी पदके पटकाविली. ए.डब्ल्यू.एस. स्विमिंग पूल वरोराचे अरविंद माथनकर यांनी ५० ते ६० वयोगटात भालचंद्र घोडमारे ३५ ते ४० वयोगटात हिमांशू गानफाडे वीस ते पंचवीस वयोगटात ओम कार्लेकर बारा ते पंधरा वयोगटात सहभागी होऊन यांनी स्पर्धेत प्रथमच पदके पटकाविली. विजय स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos