पुरात अडकलेल्या तेलंगणातील नागरीकांसाठी धावले असरअल्ली पोलिस


- चार जणांना काढले सुखरूप बाहेर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
तेलंगणा राज्यातील चार नागरीक गोदावरील नदीच्या पुरात अडकले होते. या नागरीकांना वाचविण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी असरअल्ली पोलिसांशी संपर्क साधला. असरअल्ली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता या नागरीकांसाठी मोहिम राबवून सुखरूप बाहेर काढले आहे.
आज ८ सप्टेंबर रोजी सकाळी तेलंगणा राज्यातील काटाराम येथील उपविभागीय पोलिस अधिकारी महादेवपूर तालुक्यातील पंकेना येथे गोदावरील नदीत चार नागरीक अडकल्याची माहिती देवून नागरीकांना वाचविण्यासाठी असरअल्ली पोलिसांकडे मदतीची मागणी केली. पोलिसांनी वनविभागाच्या बोटीद्वारे अभियान राबवून सोमनपल्ली ते पंकेना असा नदीच्या प्रवाहातून उलटा प्रवास करून नागरीकांना सुखरूप बाहेर काढले आहे. तेलंगणा पोलिसांनी असरअल्ली पोलिसांचे आभार मानले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-08


Related Photos