महत्वाच्या बातम्या

 कोरची : हृदय विकाराच्या झटक्याने वंदना जांभुळे यांचे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची येथील बौद्ध समाजातील प्रतिष्ठित नागरिक, शिवण यंत्र प्रशिक्षक गिरधारी जांभुळे यांची पत्नी वंदना गिरधारी जांभुळे (४८) रा. शासकीय आश्रम शाळा कोरची यांना राहत्या घरी आकस्मिक हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने रविवारी रात्री १२ वाजता दरम्यान दुःखद निधन झाले. या  मागील काही महिन्यांपासून आजारी असून घरीच उपचार घेत होत्या.

सोमवारी दुपारी २ वाजता कोचीणारा घाटावर त्यांची अंतविधी करण्यात आली. वंदना या सुद्धा आपल्या पतीसोबत दुकानात शिवण काम करीत होत्या, परंतु मागील काही वर्षांपासून हिप जॉईंट चा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांनी शिवणकाम सोडले पण घरी राहून कपड्यांची हात काच बटन शिलाई करून पतीला मदत करीत होत्या. त्या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. परिसरातील नागरिकांमध्ये या दुःखद घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, नात असा मोठा आप्त जांभुळे परिवार आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos