कुझेमर्का - येरदडमी जंगल परिसरात पोलिस - नक्षल चकमक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कुझेमर्का - येरदडमी जंगल परिसरात पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेत कोणतीही जिवितहाणी झाली नसल्याचे समजते.
सी - ६० आणि सिआरपीएफचे जवान नक्षलविरोधी शोधमोहिम राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादरम्यान पोलिस पथकाने नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली  जंगलात पसार झाले. या चकमकीनंतर शोधमोहिम राबविण्यात येत आहे. मात्र घटनेत कोणी जखमी अथवा मृत झाल्याची माहिती नाही.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-20


Related Photos