महत्वाच्या बातम्या

 कृषिपंपाच्या सौर जोडणीसाठी प्रधानमंत्री कुसुम योजना


- सौरपंपाचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शेतक-यांच्या कृषिपंपाचे विद्युतीकरण सौरऊर्जेद्वारे करण्यासाठी स्वयंअर्थसहाय्य तसेच केंद्र शासनाच्या अर्थ सहाय्यातून प्रधानमंत्री कुसुम-ब योजना राबविण्यात येत आहे. शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतक-यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतक-यांना कृषि वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषिपंप अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. योजनेंतर्गत ३, ५ व ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषि पंप ९० ते ९५ टक्के अनुदानावर उपलब्ध होणार आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतक-याना १० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यास ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे. यासाठी एसएमएस संबंधित शेतक-यास पाठविण्यात येणार आहे.

राज्य शासनाने या योजनेसाठी  महाऊर्जास १ लाख ४ हजार ८२३ सौर कृषिपंपासाठी मान्यता दिली असून मान्यतेनुसार महाऊर्जामार्फत लोकसंख्यानुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सुमारे ७५ हजार ७७८ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहे.

महाऊर्जाने सदर योजना राबविण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. शेतक-यांना ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज सादर करावे. पोर्टलवर कागदपत्रे अपालोड करणे, अर्जाची छाननी करणे, शेतक-यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाईन भरण्याची व पुरवठादार निवडण्याची शेतक-यांना मुभा देण्यात आली आहे, असे महाऊर्जाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos