महत्वाच्या बातम्या

 केंद्रीय पथकाव्दारे वर्धा व अमरावती जिल्ह्यातील नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी : खा. रामदास तडस


- खासदार रामदास तडस यांचा लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मुद्दा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली (वर्धा) : लोकसभा क्षेत्रात २७ नोव्हेबंर ते ०२ डिसेंबर पंर्यत ढंगाळ वातावरसह अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, तूर, मिरची तसेच कापूस व भाजीपाला पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे, तसेच अवकाळी पावसामुळे रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल पिक वाया गेले, आता पुन्हा रब्बी हंगामात, पिकातून चांगले उत्पन्न काढू या हिंमतीने शेतकऱ्यांनी पोटच्या पोरासारखे मेहणत घेऊन चांगल्याप्रकारे रब्बीचे पिक फुलवली होती, परंतू अवकाळी पाऊसाच्या फटक्याने रब्बी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, वर्धा लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांची समस्या बाबत २१ डिसेंबर २०२३ लाखासदार रामदास तडस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत प्रश्न उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.

वर्धा लोकसभा क्षेत्रातील वर्धा व अमरावती येथे झालेल्या अवकाळी पावसाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधतांना, अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाल्यामुळे उत्पन्न येईल की नाही याची शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण आहे, या अवकाळी पावसामुळे कापूस, तूर, गहू, हरभरा व विविध भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे, कारण शेतकऱ्यांनी कर्ज काढून पीक लावले होते, ते उद्ध्वस्त झाले आहे. ज्याचे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण केंद्रीय पथकाने करणे आवश्यक आहे. करिता लवकरात लवकर केंद्रीय पथक पाठवून वर्धा व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वेक्षण करून त्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी अशी विनंती केंद्रीय कृषी मंत्री यांना लोकसभेत खासदार रामदास तडस यांनी यावेळी केली.





  Print






News - World




Related Photos