महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवर चकमकीत सात नक्षली ठार, शस्त्रे , स्फोटके जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड / राजनंदगाव : 
छत्तीसगडमध्ये महाराष्ट्र सीमेलगत आज  शनिवारी जिल्हा राखीव दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली . जवानांनी सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. अद्याप चकमक सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. एके ४७, ३०३ राफेल , १२ बोर बंदूक, सिंगल शॉट रायफल, कार्बाईन अशी शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. 
नक्षल्यांचा शहिद सप्ताहादरम्यान घातपात घडविण्याचा हेतू होता. मात्र पोलिसांनी कट उधळून लावला आहे. पावसामुळे नक्षल्यांचे मृतदेह जंगलातून बाहेर आणण्यास अडथळे येत असून उशिरापर्यंत मृतदेह पोलीस कॅम्प पर्यंत पोहचतील अशी माहिती प्राप्त झाली आहे. 
राजनंदगावमधील बगनादी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीतागोटा जंगल परिसरात नक्षलवादी आणि जिल्हा राखीव दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. जवानांनी सात नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. त्यांच्याकडील शस्त्रे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. अद्याप चकमक सुरू असल्याची माहिती छत्तीसगडचे पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली.   यापूर्वी, २९ जुलै रोजी सुकमा जिल्ह्यातील कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात जिल्हा राखीव दलानं कारवाई करून दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यात एका महिलेचाही समावेश होता. घटनास्थळावरून शस्त्रेही जप्त करण्यात आली होती. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-03


Related Photos