महत्वाच्या बातम्या

 जनरल ड्युटी असिस्टंट फ्लेबोटॉमिस्ट साठी कौशल्य विकास प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा कौशल्य विकास कार्यालयातर्फे १५ ते ४५ वयोगटातील रोजगार इच्छुक उमेदवारांना नि: शुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे प्रत्यक्ष भेट देवून प्रवेश अर्जाचा नमुना भरून दयावा, असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, भंडारा यांनी केले आहे.

या प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी आधारकार्ड व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती एक पासपोर्ट फोटोसहीत अर्जासोबत जोडून सादर करावे,अधिक माहितीसाठी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, भंडारा येथे संपर्क करण्याचे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos