महत्वाच्या बातम्या

 अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे : आमदार विनोद अग्रवाल


- मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतक-यांनाही धानाला प्रतिक्विंटल ३ हजार १०० रुपये भाव मिळावा 

- आमदार विनोद अग्रवाल यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मांडल्या अनेक मागण्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : संपूर्ण महाराष्ट्रात जनतेचे आमदार म्हणून ओळखले जाणारे आमदार विनोद अग्रवाल हे लोकहिताचे निर्णय आणि जनहिताच्या कामांसाठी नेहमीच चर्चेत असतात तसेच ते नेहमीच लोकहितासाठी, केवळ व्यक्तीच्याच नव्हे तर सर्वांच्या हितासाठी, रस्त्यावर उतरुन काम करतात. महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सदनाचे लक्ष वेधले. गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी तालुकास्तरावर काम करणाऱ्या यंत्रणेने तातडीने पंचनामा पूर्ण करून शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी आणि मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या धर्तीवर धानाला ३१०० रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा. हेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सन्मान निधीच्या अडचणी दूर करा : आमदार विनोद अग्रवाल

पंतप्रधान किसान सन्मान अंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी ६ हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडूनही ६ हजार रुपये मोदी किसान सन्मान अंतर्गत दिले जातात, परंतु अनेक शेतकरी बांधव या लाभापासून वंचित आहेत. काही शेतकरी बांधव असे आहेत की तिसरा आणि चौथा हप्ता मिळाल्यानंतर पैसे येणे बंद झाले. अशावेळी अधिका-यांना आदेश देऊन तांत्रिक अडचण दूर करावी. कर्जमाफी योजनेत ७ हजार शेतकरी पात्र असतानाही त्यांचे कर्ज माफ झाले नाही, त्यामुळे त्यांना कृषी कर्जही दिले जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे. यासोबतच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम काही शेतकऱ्यांना मिळाली, मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांना ती देण्यात आलेली नाही, यावरही आमदार विनोद अग्रवाल यांनी सदनाचे लक्ष वेधले.

दुध उत्पादक शेतकऱ्यांनी किमान किमतीपेक्षा कमी दूध खरेदी करू नये : आमदार विनोद अग्रवाल
सरकारने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असून, किमान भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करू नये, तसेच बँकांनी जास्तीत जास्त पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठावे, अशा अनेक मागण्या आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मांडल्या.





  Print






News - Gondia




Related Photos