महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराला चालना देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : मोहाच्या फुलापासून इथेनॉल सारखे इंधन तयार करण्यास प्राधान्य देऊन गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या रोजगाराला चालना देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद आज सांगितले.

सदस्य सत्यजित तांबे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दारू निर्मितीविषयी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. अभय बंग हे गडचिरोली जिल्ह्यात व्यसनमुक्ती शिबिरे राबवत आहेत. जिल्ह्यातील व्यसनमुक्ती आणि दारू निर्मिती विरोधात धोरण ठरविण्यात येणार आहे. हे धोरण ठरविताना डॉ. बंग यांनाही विश्वासात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात मोहाच्या फुलांसदर्भात माहिती घेतली जाईल. तेथे नैसर्गिक संपत्तीपासून उद्योग वाढीसाठी, आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करणे, व्यवसाय वृद्धी करता निर्णय घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos