महत्वाच्या बातम्या

 उभ्या व कापलेल्या धान पिकासह पुंजणे चा सुद्धा सर्व्हे करून करून तातडीने पंचनामे करा : आ.विनोद अग्रवाल यांचे तहसीलदारासह प्रशासनाला निर्देश


- आमदार विनोद अग्रवालांनी प्रशासनासह शेतक-यांच्या शेतात जाऊन धान पिकाच्या नुकसानीची केली पाहणी

- एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी 

- पंचनामे करत्यावेळी अड़चणी निर्माण झाल्यास तात्काळ मला किंवा प्रशासनाला संपर्क करण्याचे आ.विनोद अग्रवाल यांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात २८ नोव्हेंबर पासून सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे गोंदिया तालुकासह गोंदिया जिल्ह्यातील शेतक-यांचे धान पिकाचे तसेच इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यावर आ.विनोद अग्रवाल यांनी तातडीने २९ नोव्हेंबर रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेउन गोंदियातील झालेल्या धान पिकांच्या नुकसानीची बाब निर्देशनास आणून देत निवेदनाच्या माध्यमातून तातडीने नुकसानीची पंचनामे करून शेतक-यांना मदद करण्याचे निवेदन दिले होते.

त्या अनुषंगाने त्याच दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेत मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आ.विनोद अग्रवाल यांनी तहसीलदार गोंदिया यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसे पत्र सुद्धा तहसीलदार गोंदिया यांना ग्रामसेवक, तलाठी, कृषिसेवक यांना गावे वाटप करून तातडीने पंचनामा करण्याचे आदेश काढले. तरी सुद्धा अनेक गावातील ग्रामसेवक आजही संबधीत गावात पोहचले नसल्याची तक्रार प्राप्त होताच आज आ.विनोद अग्रवाल यांना कोणतेही गावातील नुकसान ग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावे व ज्या ठिकाणी संबधित अधिकारी पोहचले नसतील त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून तातडीने पंचनामे करण्याचा सुचना केली.

आज आ.विनोद अग्रवाल यांना मा.तहसीलदार, कृषी अधिकारी, खंड विकास अधिकारी तसेच पंचायत समिती चे सभापती मुनेश रहांगडाले यांचे सह शेतक-यांच्यासह शेतामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात उभ्या धानपिकाचे तसेच कापणी करून ठेवलेल्या धानच्या पुंजण्याचे झालेले नुकसान निदर्शनास आणून दिले. सर्व प्रकारच्या धान पुंजण्याचे व उभ्या धान पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून एकही नुकसान ग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी असे निर्देश दिले. अन्यथा प्रशासन जवाबदार असेल अश्या कडक सुचना देखील प्रशासनाला केल्या. मा.तहसीलदार गोंदिया यांनी या संबधीचे त्वरित पत्र काढून सर्व धान उत्पादक शेतक-यांच्या सर्व प्रकारच्या पिकाचे तसेच इतर पिकाचे सर्व पंचनामे करण्यात येणार अशी ग्वाही दिली असून आमदार विनोद अग्रवाल यांनी पंचनामे एन झाल्यास थेट संपर्क करण्याचे आश्वासन दिले आहे.





  Print






News - Gondia




Related Photos