महत्वाच्या बातम्या

 कामगार नेते बाबु भालाधरे यांचा स्मृतिदिन साजरा करून त्यांचे अपूर्ण कार्य कार्यकर्ते पूर्ण करणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शानिवार २ डिसेंबर २०२३ रोज कंत्राटी कामगारांचे लोकप्रिय कामगार नेते बाबू भालाधरे यांचा ७ वा स्मृतीदिनानिमित्य याच दिवशी २०१६ मध्ये तमाम पीडित कामगारांना सोडून आपल्यातुन निघून गेले. 

या दिनी कामगारांनी रोजंदारी मजदूर सेना कार्यालयात श्रद्धांजली वाहून सदर दिवस संघर्ष दिन म्हणून साजरा केला जातो. संघटनेचे संस्थापक सदस्य मनोज घरडे, शिवशंकर बडवाइक संस्थापक सदस्य, महेंद्र बागडे विदर्भ अध्यक्ष, प्रकाश फुलवरे विदर्भ सचिव यांनी महामानवाचे अर्धकृती पुतळ्याचे पुष्पमाला अर्पण करून मेणबत्ती लावून बाबू भालाधरे यांचे प्रतिमेचे पूजन केले आणि सर्व कामगारांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

महाराष्ट्रातील कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, भुसावळ, परळी, पारस, तिरोडा येथील कंत्राटी कामगारांनी बाबू भालाधरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच १३ डिसेंबर २०२३ ला हिवाळी अधिवेशन नागपूर येथे महाराष्ट्र राज्य रोजंदारी मजदूर सेनेद्वारा विधानसभेवर मोर्चा काढून कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता बहुमताने निर्णय घेतला आणि आपले दिवंगत नेते बाबु भालाधरे यांचे असलेले अपूर्ण कार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि श्रद्धांजली सभा संपन्न झाली.





  Print






News - Nagpur




Related Photos