महत्वाच्या बातम्या

 आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते काटी, कोचेवाही आणि तांडा येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संपन्न


- शेतकरी बांधवांनी आपले धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकावे : आमदार विनोद अग्रवाल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीला सुरुवात झाली असून गोंदिया तालुक्यातील काटी, कोचेवाही आणि तांडा येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार विनोद अग्रवाल यांच्या संपन्न झाले. 

यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी यंदा धान खरेदी होण्यामध्ये उत्पन्न झालेल्या अडचणीवर कसा तोडगा काढण्यात आला याचे कथन केले. दरवर्षी शेतकरी आपले धान विक्रीसाठी तयार करतो आणि काही न काही अडथळा धान खरेदी मधे निर्माण होऊन जातो. शासन आणि धान खरेदी केंद्रामध्ये शेतकरी भरडल्या जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आमदार विनोद अग्रवाल यांनी आणून दिले होते आणि तत्काळ तोडगा धान खरेदी करण्याबाबत काढण्यात यावा अशी मागणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कडे केली होती. तसे न झाल्यास तोडगा निघे पर्यंत धान खरेदी ची पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात यावी अशी मागणी देखील आमदार विनोद अग्रवाल यांनी केली होती. मात्र आमदार विनोद अग्रवाल यांनी मागणी केल्यानंतर मंत्रालयात झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत तोडगा निघाला आणि धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला.

शेतकरी बांधवांनी आपले धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकावे : आमदार विनोद अग्रवाल

यंदा सुद्धा धानाला बोनस मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपले धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकावे असे आवाहन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले आहे. सोबतच पीक विमा आणि अन्य शेतकरी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रम दरम्यान काटी, कोचेवाही आणि तांडा येथील धान खरेदी केंद्राचे संचालक मंडळ आणि सदस्य तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos