हाफिज सईदच्या मुसक्या आवळल्या, पाकिस्तानमध्ये अटक


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लाहोर :
२६ /११चा मास्टर माईंड, पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अटक करुन त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पाकविरोधी दहशवादी कारवाईबाबत भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हाफिज सईदची महत्त्वाची भूमिका होती. त्याचे पुरावे भारताने पाकिस्तानला सोपवले होते. मात्र हाफिजच्या मुसक्या आवळण्यात टाळाटाळ करणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय दबावासमोर झुकावं लागलं आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
पाकिस्तानमध्ये २६ /११ बाबत चाललेल्या खटल्यात हाफिज सईदला इतके दिवस अटकच होत नव्हती. या हल्ल्यातील दुसरा आरोपी डेव्हिड हेडलीची साक्ष आणि भारताने दिलेल्या अनेक पुराव्यानंतरही पाकिस्तान हाफिज सईदवर कारवाई करत नव्हतं. मात्र आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या कूटनीतीनंतर अखेर हाफिज सईदला बेड्या ठोकण्यात आल्या.
  Print


News - World | Posted : 2019-07-17


Related Photos