महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी विशेष शिबिर


- २५ व २६ नोव्हेंबर रोजी सर्व मतदान केंद्रावर आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर ७१- चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या नागरिकांची नावे नोंदविणे, मतदार यादीतील मय्यत मतदारांचे नाव कमी करणे तसेच मतदार यादीत नावाच्या चुका, पत्ता व आधार जोडणीबाबत विशेष मतदार शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

या शिबिराचे आयोजन २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७१- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर करण्यात आले आहे. तरी, सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी केले आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos