महत्वाच्या बातम्या

 सुरक्षा गार्ड व सुपरवाईजर भरती रोजगार मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : कॅप्सटन फॅसिलीटीस मॅनेजमेंट लिमिटेड कुकटपल्ली हैदराबादच्यावतीने आर्वी व पुलगाव येथे सुरक्षा गार्ड व सुपरवाईजर या पदासाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

६ नोव्हेंबर रोजी पंचायत समिती आर्वी येथे व ७ नोव्हेंबर रोजी नगर परिषद हॉल येथे सकाळी ११ ते ३ वाजतापर्यंत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भरती मेळाव्यात सुरक्षा गार्ड व सुपरवाईजर या पदासाठी उमेदवार इयत्ता ८ वी पास ते १० वी नापास असावा, उंची १६५ सेमी व वय १८ ते ३५  वर्ष असावे.

भरती मेळाव्यास येतांना मुळ शैक्षणिक पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, आधारकार्ड व बँक पासबुकची छायांकित प्रत सोबत आणावी, असे  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos