महत्वाच्या बातम्या

 लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय, वरोरा च्या मुलींचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर


- नागपूर विभाग शालेय स्पर्धेत अजिंक्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वरोरा : वर्धा येथे झालेल्या नागपूर विभागीय स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलींच्या गटात लोक शिक्षण संस्था, वरोरा अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय ने चंद्रपूर जिल्हाचे प्रतिनिधित्व करताना नागपूर मनपा संघाचा २५-१० २५-१४ असा सरळ दोन डावात पराभव  केला व नागपूर विभागीय स्पर्धेचे अजिंक्यपद कायम राखले. सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय सदर स्पर्धेकरिता पात्र ठरला आहे.

विजयी संघात प्रगती कायरकर, राधा कडू, फाल्गुनी कासावार, पूर्वा घानोडे, कस्तुरी नागेकर, अतिशा सपाटे, प्रणोती पेटकर, फाल्गुनी पवार व ऋतुजा वैरागडे यांचा समावेश होता.
लोकशिक्षण संस्थेने गेली ५० वर्षांपासून व्हॉलीबॉल खेळात नेत्रदिपक कामगिरी करीत खेळातील वर्चस्व कायम राखले आहे.

लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्ण घड्याळपाटील, कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी, ॲड. दुष्यंत देशपांडे, सदस्य मंगेश मल्हार, मुख्याध्यापक राहुल राखे, उपमुख्याध्यापक दिपक नवले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, वरोरा गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चहारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, संदीप उईके यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.

सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय जेष्ठ मार्गदर्शक सुनील बांगडे, अनिल घुबडे, गणेश मुसळे,प्रशिक्षक निखिल बोबडे, प्रणाली मेश्राम, दुशांत लांडगे, प्रा. उत्तम देऊळकर, पालक तसेच लोकशिक्षण संस्था वरोडा यांना दिले आहे, विजयी संघांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos