सामाजिक न्याय दिनानिमित्त गडचिरोलीत समता दिंडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन आज २६  जून रोजी सामाजिक न्याय दिन म्हणून सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौक  येथून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, समता दिंडी काढण्यात आली. नामदेवराव गडपल्लीवार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रभात फेरीस सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (माध्यमिक) निकम,  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त  पांडे ,  जिल्हा समाज कल्याण अधिकारी पेंदाम ,  समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त  मोहतुरे, तसेच गडचिरोली शहरातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
सामाजिक न्याय दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कॉम्प्लेक्स या ठिकाणी सकाळी ११  वाजता आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपायुक्त राजेश पांडे,   होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून समाजभूषण पुरस्कार सन्मानित नानाजी वाढई व ज्ञानेश्वर मेश्राम, समाजउत्थान पुरस्कार सन्मानित   ममता जांभुळकर,   सुरेखाताई बारसागडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव गडपल्लीवार, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ, संशोधन अधिकारी   पुष्पलता आत्राम इ. मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले. या कार्यक्रमास व्याख्याते म्हणून प्रा. यादवराव गहाणे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात पांडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षण व आरक्षण विषयी केलेल्या कार्याबद्दल  माहिती देवून तळगाळातील लोकांपर्यत शिक्षण तसेच शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे जागतिक व्यसनमुक्ती विरोधी दिन असल्याने सर्वांनी व्यसनापासून परावृत व्हावे, असेही याप्रसंगी आवाहन केले.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली, सर्व महामंडळे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय तसेच शासकीय वसतीगृहातील अधिकारी व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिवाजी पाटील, तालुका समन्यवयक यांनी तर आभार प्रदर्शन मनिष गणवीर, जिल्हा प्रकल्प समन्वयक (समता दूत) यांनी केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-26


Related Photos