महत्वाच्या बातम्या

 गोंदिया येथे २०० विद्यार्थी क्षमतेचे ओबीसी वसतिगृह बांधणार : आमदार विनोद अग्रवाल


- इमारत बांधकाम पूर्ण होईपर्यंत भाडे तत्वावर इमारत घेऊन ओबीसी वसतिगृह सुरू करण्याचे आमदार विनोद अग्रवाल यांचे जिल्हाधिकार्यांना निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया येथे इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा नसल्यामुळे येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरून येणाऱ्या मुला-मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

ओबीसी विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी दखल घेत राज्याचे ओबीसी व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री यांच्यासोबत चर्चा करून गोंदिया शहरात १०० मुले व १०० मुलींसाठी ओबीसी वसतिगृहाची मागणी केली असता सदर विषयाला मंत्रालय स्तरावरून हिरवा झेंडा देण्यात आला असून गोंदियात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

या विषयावर आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांची भेट घेऊन ओबीसी वसतिगृह बांधण्याबाबत चर्चा केली होती. गोविंदपूर परिसरात वसतिगृहासाठी जागा निवडण्यात आली असून वसतिगृहाच्या इमारतीची जमीन आणि बांधकामाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी भाडे तत्वावर इमारत घेऊन ओबीसी वसतिगृह सुरू करण्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी महोदयांना दिले आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos