महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना संग्रहालय नागपुरातच होणार : आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे आश्वासन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : आदिवासी विकास विभागाने एका आमदाराच्या पत्रावर नागपूरात साकारण्यात येणारे गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय पारशिवनी येथील चारगावमध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हे संग्रहालय नागपुरातच होणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिले.

आदिवासी कृती समितीचे नागपुरात विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी आज मंत्री गावित यांनी भेट दिली.

२० वर्षापूर्वी गोंडवाना संग्रहालयाला केंद्र सरकारने मंजूरी दिली होती. नागपुरातील सूराबर्डी येथे संग्रहालयासाठी जागा आरक्षित करण्यात आली होती. पण आदिवासी विकास विभागाने हे संग्रहालय पारशिवनीत उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील विविध संघटनांनी या निर्णयाच्या विरोषात संयुक्त आदिवासी कृती समितीची स्थापना करून २७ सप्टेंबरपासून संविधान चौकामध्ये साखळी उपोषण सुरू केले होते.

या साखळी उपोषणाला बुधवारी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी भेट देवून आंदोलकाच्या मागण्या मान्य करीत गोंडवाना संग्रहालय नागपुरातच होईल व हिवाळी अधिवेशना दरम्यान संग्रहालयाचे भूमिपुजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, माजी महापौर माया इवनाते, दिनेश शेराम, मधुकर उईके, आर.डी. आत्राम, गंगा टेकाम, शांता कुमरे आदी उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos