महत्वाच्या बातम्या

 अण्णासाहेब पाटील व पं. दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय तसेच जिल्हा कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने स्व.आमदार अण्णासाहेब पाटील व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रशासकीय इमारतीमधील महामंडळाच्या कार्यालयामध्ये कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहायक आयुक्त निता औघड यांनी दोनही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी रूपसिह ठाकूर, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सागर आंबेकर, रुपेश रामगडे, धिरज मनवर, मुकेश वाघुले, अतुल वऱ्हेकर आदी उपस्थित होते.

यावेळी सर्व उपस्थिांसह आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेचे लाभार्थी अजय मापारी, योगेश श्यामराव भांबेरे, पूजा गोडसे, संदीप गोडसे यानी देखील प्रतिमेचे पुजन व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.





  Print






News - Wardha




Related Photos