चोरट्यांनी अहेरी येथील कन्यका मंदिरातील दानपेटी फोडली, अंदाजे ५० हजार रूपये केले लंपास


- अहेरी पोलिसांत गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी :
येथील कन्यका मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने ४५ ते ५० हजारांची रक्कम लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात कलम ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
चोरट्याचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, उपपोलिा ठाणे, पोलिस मदत केंद्रांना सुचना देण्यात आल्या आहेत. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दानपेटी फोडून रक्कम लंपास केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-08


Related Photos