महत्वाच्या बातम्या

 पीएम किसानच्या लाभार्थ्यांनी बँक खाते आधारशी जोडणे आवश्यक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या १५ व्या हप्त्याचे वितरण ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित आहे. लाभार्थ्यांना आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे, केवायसी प्रमाणिकरण करणे, आणि लॅड सिंडिंग करणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांनी खाते जोडले नसतील त्यांनी ते तातडीने जोडून घ्यावे. खाते आधारला न जोडल्यास योजनेचा पुढील हप्ता बँक खात्यात जमा होण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात १४ सप्टेंबर अखेर १५ हजार ३५१ लाभार्थ्यांची बँक आधारशी जोडणी तर १७ हजार १६९ शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्यापही प्रलंबित आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटूंबास प्रती हप्ता दोन हजार याप्रमाणे वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येतो. योजनेच्या १५ व्या हप्त्याचा लाभ ऑक्टोबर महिन्यात जमा केला जाणार आहे. त्यापुर्वी खाते आधारशी जोडणे आवश्यक आहे.

ई-केवायसी करण्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने पीएम किसान पोर्टलवरील फार्मर कॉर्नर ई-केवायसी ओटीपी आधारित अथवा सामायिक सुविधा केंद्रामध्ये किंवा पीएम किसानच्या नवीन ॲपद्वारे तसेच लाभार्थ्यांना आधार जोडणीची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर मार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आधारकार्ड, मोबाईल क्रमांक याआधारे गावातील पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत इंडियन पोष्ट पेमेंट बँकेत खाते उघडावे.

लाभार्थ्यांचे भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्यावतीकरण करण्यासाठी गावचे तलाठी अथवा संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून सर्व बाबींची पुर्तता करावी. पीएम किसान सन्मान योजनेच्या १५ व्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos