अहेरी नगर पंचायतला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्या


 - नगराध्यक्षांच्या नेतृत्वात भाजपा शिष्टमंडळाने केली पालकमंत्र्यांकडे मागणी 
- पालकमंत्र्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
-  येत्या ५ दिवसात नवीन मुख्याधिकारी येणार असल्याची दिली माहिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
स्थानिक  नगर पंचायतचे पहिले पूर्णवेळ मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांची वडसा येथे बदली झाली होती.  त्यानंतर दीक्षांत देशपांडे यांच्याकडे अहेरीच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला होता.  परंतु त्यांचीही तहसीलदार ह्या पदावर निवड झाल्यामुळे अहेरी नगर पंचायतचे  मुख्याधिकारी पद सध्या रिक्त आहे, तात्पुरत्या  कामांसाठी तहसीलदार अहेरी यांच्या कडे सद्या हे प्रभार देण्यात आला आहे. 
  अहेरी नगर पंचायत मद्ये पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने ह्याचा मोठा परिणाम येथील विकास कामांवर होत आहे. अनेक कामे प्रलंबीत आहेत. नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, हे सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लागावे ह्यासाठी अहेरीच्या नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या एका शिष्टमंडळाने अहेरी येथे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री  ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची  भेट घेवून त्यांना एक निवेदन सादर केले.  अहेरी नगर पंचायतला तात्काळ पूर्णवेळ मुख्याधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांच्या कडे केली. 
 मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अहेरी व सिरोंचा नगर पंचायतला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा ह्यासाठी शासन स्तरावर आपला पाठपुरावा सुरू असून ह्यात आता यश आले आहे. अहेरी नगर पंचायतला येत्या ५  दिवसात नवीन मुख्याधिकारी येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नवीन मुख्याधिकारी आल्यावर अहेरी शहरातील विकासकामांनां निश्चितच गती येईल असा विश्वास ही यावेळी पालकमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी व्यक्त केला. 
 निवेदन सादर करतांना अहेरीच्या नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार,भाजपा अहेरी शहराध्यक्ष मुकेश नामेवार,पप्पू मद्दीवार, सचिन पेद्दापलीवार,दिलिप पडगेलवार, गुड्डू ठाकरे, इंनू भाई, निसार सय्यद   उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-05


Related Photos