महत्वाच्या बातम्या

 आमदार विनोद अग्रवाल यांच्यामुळे मनीषा चे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण


- ३१ लाख ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून मनीषा फूलसुंगे साठी ३१ लाख ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर करुन आणली असून मनीषाचे परदेशात शिकण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मनीषा ने बीएससी ऍग्रीकल्चर मधे पदवी प्राप्त केली असून हिमाचल येथे ऍग्रीकल्चर बिज़नेस मैनेजमेंट मधे पोस्ट ग्रेजुएशन पूर्ण केले आहे. पुढील शिक्षणासाठी मनीषा ने न्यू कासल यूनिवर्सिटी यूनाइटेड किंग्डम येथे अप्लाय केले होते जेथे तिची पुढील शिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. 

मात्र आर्थिक परिस्तिथी मुळे हाती आलेली संधी जाणार कि काय हे लक्षात येताच मनीषाच्या आईने आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे धाव घेतली. आमदार विनोद अग्रवाल यांनी शिष्यवृत्तीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन मनीषा आणि तिच्या आईला दिले होते आणि  ३१ लाख ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती आदिवासी विभागाद्वारे आमदार विनोद अग्रवाल यांनी मंजूर करून आणली.

मनीषाची आई झाली भावुक, मानले विनोद अग्रवाल यांचे आभार : 
मनीषा हुशार असून आपल्या मेहनतीने तिने आता पर्यंत सगळ्या अडीअडचणींचा सामना करत शिक्षण घेतले. मात्र परदेशात शिक्षण घ्यायची संधी हाती आली असतांना संधी हातातून जाते कि काय या चिंतेने मनीषाच्या आईने आमदार विनोद अग्रवाल यांचे जनसेवा केंद्र गाठले. मनीषा चे परदेशात शिकायचे स्वप्न स्वप्न न राहता आता पूर्ण होणार असल्याने मनीषाची आई भावूक झाली होती. मनीषाच्या आईने आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रती आभार व्यक्त केले आहेत.

मनीषाला शुभेच्छा : आमदार विनोद अग्रवाल
मनीषा फुलसुंगे अत्यंत हुशार मुलगी असून तिच्या उच्चशिक्षणासाठी मदत करतांना आनंद होत आहे. शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार असून त्यासाठी वाटेल ती मदत करायला लोकप्रतिनिधी म्हणून मी सदैव तयार आहे.





  Print






News - Gondia




Related Photos