३३ कोटी वृक्ष लागवड : गडचिरोली जिल्ह्याकरीता १०८.६० लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट


- ५६.५३ लाख खड्डे तयार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी /  गडचिरोली : 
सन 2019 मधील नियोजित 33 कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत गडचिरोली जिल्हयाकरीता एकूण  108.60 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट शासनस्तरावरुन ठरवून देण्यात आले आहे.  33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी वेळोवेळी विविध यंत्रणांना वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करुन लागवड केलेल्या रोपांचे संगोपन व जोपासना यशस्वीरीत्या करण्याचे आव्हान आहे.   जिल्हयातील सर्वसामान्य नागरिक/लोकप्रतिनिधी/स्वयंसेवी संस्था/विद्यार्थी यांनी सदर कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवावे असे आवाहन  जिल्हाधिकारी  शेखर सिंह यांनी केले आहे. 
     सध्यस्थितीत जिल्हयाला प्राप्त उद्दिष्टानुसार ऑनलाईन प्रणालीवर नियोजनाची माहिती भरणा करण्यात येत आहे.  जवळपास 108.84 लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजनाची माहिती विविध यंत्रणानी अपलोड केलेली आहे. वन व एफडीसीएम विभागामार्फत जवळपास 35.40 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट नैसर्गिक संगोपनामार्फत साध्य करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हयाचे एकंदर उद्दिष्ट जरी 108.60 लक्ष असले तरी प्रत्यक्षात 64.60 लक्ष रोपांची आवश्यकता सन 2019 मधील 33 कोटी वृक्ष लागवडीकरीता राहणार आहे.
   त्याचप्रमाणे 13 कोटी मधील मरअळ व सन 2019 मधील 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये लागणारी मरअळ या बाबींचा विचार करता गडचिरोली जिल्हयाकरीता जवळपास 97.00 लक्ष रोपे लागणार असून त्या तुलनेत वनविभागाकडे 70.00 लक्ष सामाजिक वनीकरण विभागाकडे 10.48 लक्ष आणि एफडीसीएम विभागाकडे 19.00 लक्ष 99.48 लक्ष रोपे जिल्हयातील विविध रोपवाटीकेमध्ये तयार आहेत.
 गडचिरोली जिल्हयातील एकूण 456 ग्रामपंचायतींना वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत प्रति ग्रामपंचायत 3200 रोपे याप्रमाणे रोपांचा पूरवठा लागवड कालावधीत वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर प्रशासकीय यंत्रणांना रोपे वन व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिनिस्त वनपरिक्षेत्रातील रोपवाटीकेतून उचल करण्याचे सुचना दिलेल्या आहेत.नियोजित 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात समाजातील विविध घटकांचे सहकार्य प्राप्त करण्यासाठी हरित सेवकांची नोंदणी करण्यात आली असून आतापर्यंत जवळपास 1.45 लक्ष हरित सेवक जिल्हयाशी जोडले गेले असून, वन व पर्यावरणविषयक विविध कार्यक्रमात त्यांना सामावून घेण्यात येत आहे. एकूण एकंदर नियोजीत 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी वेळोवेळी विविध यंत्रणांना वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-29


Related Photos