निवडणूक हरल्यानंतरही नव्या मंत्रिमंडळात हंसराज अहीर असणार


- नितीन गडकरींनी दिले संकेत 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
 चंद्रपूर मतदार संघातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश धानोरकर यांचा विजय झाला.  पराभवानंतर  हंसराज अहीर यांना मंत्रिपद मिळणार नाही असे वाटत होते. मात्र  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अहीर यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यात येईल असे म्हटले आहे. त्यामुळे आता नव्या मंत्रिमंडळात हंसराज अहीर असणार आहेत हे नक्की  असल्याचे बोलल्या जात आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना  ५ लाख १४ हजार ७४४ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांना ५ लाख ५९ हजार ५०७  मते मिळाली आहेत.  सुरूवातीपासून दोन्ही उमेदवारांमध्ये चुरूस सुरू होती. गुरूवारी रात्री उशीरा अहीर यांचा पराभव जाहीर करण्यात आला.   Print


News - Nagpur | Posted : 2019-05-25


Related Photos