महत्वाच्या बातम्या

 स्वप्न बघा स्वप्नाचा पाठलाग करा आणि यशस्वी व्हा : नागपूर आंचलचे आंचलिक प्रबंधक जय नारायण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आरसेटी च्या प्रशिक्षणार्थ्यांनो प्रशिक्षण करता करता स्वप्ने बघा त्या स्वप्नांचा तोपर्यंत  पाठलाग करा जोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही असा मार्मिक सल्ला बँक ऑफ इंडिया, नागपूर आंचलचे आंचलिक प्रबंधक जय नारायण यांनी दिला. 

गडचिरोली येथे ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजीत आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालीत ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) गडचिरोली येथे अद्यावत संगणक कक्षाचे उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. 

आरसेटी गडचिरोली यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक. युवती साठी प्रशिक्षणा सोबतच संगणकाचे महत्त्व जाणून प्रशिक्षणार्थी खऱ्या अर्थाने अद्यावत झाला पाहीजे याकरीता आरसेटी गडचिगेलीचे कार्य स्पृहनिय आहे असे गौरवोद्गार सुद्धा त्यांनी काढले. नाते बँकींग पलीकडचे या उक्तीप्रमाणे आर सेटीचे कार्य चालू राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.  

याप्रसंगी जिल्हा अग्रणी प्रबंधक युवराज टेंभूर्णे, गडचिरोली चे प्रख्यात उद्योजक तथा इंजिनिअर प्रमोद पिपरे, नागपूर चे बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक राजेश सोनकुसरे, वरिष्ठ प्रबंधक आनंद बोरकर, राजभाषा प्रबंधक राजू, आरसेटी चे संचालक कैलाश बोलगमवार, महाराष्ट्र राज्य  ग्रामीण जीवनोन्नती अभियान चे सायंकार, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रितम कारडे, कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम तथा पुरुषोत्तम कुनघाडकर तथा ज्यूट प्रॉडक्ट उद्यमी व फास्ट फूड स्टॉल उद्यमी या दोन्ही प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

या प्रसंगी क्रेडीट आऊटरीच कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बँक ऑफ इंडिया च्या कर्ज घेतलेल्या महिला आणि उद्योजक यांना कर्ज वितरण पत्राचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बँक ऑफ इंडियाचे  सर्व शाखांचे प्रबंधक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत मेश्राम तर आभार प्रदर्शन जिल्हा अग्रणी प्रबंधक युवराज टेंभूर्णे यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos