कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल, गुंतवणूकदारांचा आकडा ५ कोटींच्या वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
सर्वसामान्यांना विविध आमिष दाखवून शिफा नामक महिलेने शहरात कोट्यवधींचा गंडा घातला. या महिलेवर नागरिकांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शिफा नामक महिलेचे दररोज नवनविन किस्से समोर येत आहेत. १० हजारात एक तोळा सोना, २० हजारात दुचाकी, अडीच लाखात चारचाकी तसेच ७० हजारात घरकुल बांधकाम एवढेच नाही तर नौकरी लाउन देण्याची हमी सुध्दा या महिलेने घेतली होती. महिला पसार झाल्याची बातमी छापून येताच गुंतवणूकदारांची पाया खालची जमीन  सरकली  आहे. गुंतवणूकदारांनी रविवारला पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांकडून तक्रार घेतली गेली नाही. मात्र त्यानंतर वरिष्ठांकडे या बाबत विनंती करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या दबावाखाली स्थानिक पोलिसांनी तक्रार दाखल केली. 
 पोलिसांकडे दिलेल्या तक्रारी मध्ये नागरिकांनी दिलेला गुंतवणूकीचा आकडा डोके चक्रावणारा आहे. कित्येकांनी ५ लाखाच्यावर रक्कम गुंतवलेली आहे. शिफा नामक महिला ही रक्कम फक्त महिलांकडूनच घेत होती. ब्युटी पार्लर असलेल्या घरी पुरूषांना प्रवेश नसल्याचे नोटीस चिपकविले आहेत. एवढेच नाही तर रक्कम गुंतविल्यावर टप्प्या टप्प्यानी गूंतवणूकदारांना साहित्य दिल्या जाणार असल्याचे नोटीस चिपकविले आहे. मागिल काही महिण्यापासून या महिले कडे शहरातील नामांकित उद्योगपतीनी ये-जा सुरू केली होती. अव्वाच्या सव्वा व्याजानी शिफा लोकांकडून रक्कम घेत होती. कित्येक महिलांनी १५ ते २० लाख रूपये जादा व्याजाच्या लालसेपाई शिफाला दिले होते. जीएसटी.च्या रक्कमेचा भरणा करावा लागत असल्याचे सांगून गुंतवणूकदारा कडून जादा पैसा वसूल केला आहे.   आपल्याला वस्तू मिळणारच या आशेने महिलांनी देखील कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुपचूप रक्कम शिफाच्या हवाली केली आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांनी देखील इकडून तिकडून रक्कम जमवून लाखाच्यावर वरची रक्कम शिफा कडे गुंतविली आहे. मात्र या व्यवहारात कोणत्याही प्रकारचा कागदी पुरावा नसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तिच्यावर भांदवि कलम ४२० अतंर्गत गुन्हा नोंदविला असून अधिक तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-14


Related Photos