महत्वाच्या बातम्या

 आर्वी- तळेगाव रखडलेल्या महामार्गाचे काम नवीन एजन्सी मार्फत लवकरच पूर्ण करण्यात येणार


- खा. रामदास तडस यांना लोकसभेत केंद्र सरकारचे उत्तर

- खा. रामदास तडस लोकसभेत अतारांकित प्रश्न संख्या ३ हजार ५२१ उपस्थित केल मुद्दा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / दिल्ली (वर्धा) : वर्धा जिल्हयातील आर्वी-तळेगांव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४७ अ चे निर्माण कार्य अनेक महिन्यापासुन प्रलंबीत आहे. या कामाचा त्रास प्रत्येक नागरिकाला होत आहे, हे कार्य पुर्ण व्हावे यासाठी अनेक आंदोलन सुध्दा झाली, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खा. रामदास तडस यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न संख्या ३ हजार ५२१ अंतर्गत आर्वी तळेगाव-महामार्ग प्रकल्पाच्या कामाच्या संथ गतीची कारणे आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारकडून उचलण्यात येत असलेली पावले याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले.

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी या प्रश्नाला उत्तर देतांना स्पष्ट केले की, महाराष्ट्र राज्यातील NH-३४७ A वरील सालोड-पुलगाव-आर्वी-तळेगांव या पट्ट्यातील आर्वी-तळेगाव प्रकल्पाच्या १३.७० किमी लांबीच्या बांधकामाचे काम मागील दोन कंत्राटदारांच्या (मे. वसिष्ठ प्रोजेक्ट्स आणि मे. पीएमए कन्स्ट्रक्शन कंपनी) अकार्यक्षमतेमुळे विलंब झालेला असुन त्यांचे  करार संपुष्टात आले. आर्वी तळेगावचे उपरोक्त काम मे. दृष्टी स्ट्रक्चरल इंजी. प्रा. लि., मुंबई ला २० जून २२३ रोजी देण्यात आले असुन आर्वी-तळेगाव रखडलेल्या महामार्गाचे काम नवीन एजन्सी मार्फत लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे उत्तरातुन स्पष्ट केले.

आर्वी-तळेगांव या महामार्गाचे विकास काम विहीत वेळेत पुर्ण होऊ न शकल्यामुळे अनेक नागरिकांनी, लोकप्रतिनीधी यांनी वेळोवळी मला अवगत केले, सदर काम वेळेत पुर्ण व्हावे या दृष्टीकोनातुन आज संसदेत हा विषय उपस्थित केला. काम मंजूर करून आणणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. पण या कामात दोन कंत्राटदार काम अर्धवट सोडून गेले, एक कंत्राटदार न्यायालयात गेला व तीन वेळा एकाच कामाची नवीन निविदा प्रक्रिया झाल्याने खूप वेळ गेला. प्रशासकिय स्तरावर कुठेही विलंब होऊ नये म्हणून मी सतत सर्व यंत्रणांच्या संपर्कात होतो, आता हे काम विहित मुदतीत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रीया खा. रामदास तडस यांनी यावेळी दिली.





  Print






News - World




Related Photos